पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रॉक्टर्ड मेथडने

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या () ८ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने () होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी; तसेच परीक्षांचा ऑनलाइन दर्जा वाढविण्यासाठी चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. विद्यार्थ्यांना अनेक दिवस अभ्यासाला मिळाल्याने, अनेक विषयांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचा विद्यार्थ्यांना अंदाज येण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ३ ते ५ डिसेंबर दरम्यान सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली असून, पहिल्या दिवशी ४५ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली. विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतल्या. त्यानंतर आता विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणीसुधार परीक्षा होणार आहेत. या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ, नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या (बॅकलॉग) परीक्षांमध्ये या अडचणींची पुनरावृत्ती न होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. जवळपास पावणे तीन लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत.श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या (बॅकलॉग) परीक्षांची तयारी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या दिवशी ४५ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रॉक्टर्ड या परीक्षा पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परीक्षार्थींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी कॅमेराचा वापर करण्यात येणार असून, विद्यार्थ्याचे काही छायाचित्रे देखील काढण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त अन्य हालचाली झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबतचा इशारा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. साधारण वीस इशारे देण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गैरप्रकार करता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये; तसेच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा दर्जा राखण्यासाठी विद्यापीठाने चांगला निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पुन्हा शून्य गुण आणि अनुत्तीर्ण ? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक समस्या उद्भवल्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला असून, ती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्टुडन्ट प्रोफाइलवर पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. या निकालात नियमानुसार काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांच्या शून्य गुण मिळाल्याच्या; तसेच कमी गुण मिळाल्याच्या अडचणी विद्यापीठाकडे येत आहेत. या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेउन ठेवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ काय निर्णय घेण्यात येतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lPV8vu
via IFTTT

Post a Comment

0 Comments