२०२० मध्ये देशातल्या 'या' महाविद्यालयांनी मिळवले टॉप १० मध्ये स्थान

दरवर्षीप्रमाणे २०२० या वर्षातही भारताच्या शिक्षण मंत्रालयाने NIRF रँकिंग जाहीर केले होते. भारतातील सर्वोत्तम कॉलेज, विद्यापीठांची यादी केंद्रीय मंत्रालयाने जारी केली होती. टॉप १० पैकी (Top 10 college in 2020) पाच महाविद्यालये दिल्ली विद्यापीठाशी संलग्न होती. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेले मिरांडा हाऊस या महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले. 2020: ही आहेत २०२० मधील भारतातील टॉप १० महाविद्यालये १. मिरांडा हाउस २. लेडी श्रीराम कॉलेज ३. हिन्दू कॉलेज ४. सेंट स्टीफन कॉलेज ५. प्रेसीडेंसी कॉलेज ६. लोयोला कॉलेज ७. सेंट झेवियर्स कॉलेज ८. रामकृष्ण मिशन विद्यामंदिर ९. हंसराज कॉलेज १०. पीएसजीआर कृष्णा मल कॉलेज फॉर विमेन कधी आणि कशी झाली होती NIRF ची सुरुवात? NIRF ची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. ४ एप्रिल २०१६ रोजी पहिली रँकिंग जाहीर करण्यात आली होती. पहिली यादी केवळ चार श्रेणीतील होती, मात्र यंदा १० विविध विभागांमध्ये रँकिंग जारी करण्यात आली होती. ओव्हरऑल, यूनिवर्सिटी, इंजीनियरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, कॉलेज, मेडिकल, लॉ, आर्किटेक्चर आणि डेंटल अशा विभागांमध्ये सर्वोत्तम संस्थांची निवड करण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ro1shN
via IFTTT

Post a Comment

0 Comments