Also visit www.atgnews.com
एमफिल,पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पांसाठी पुन्हा मुदतवाढ
Submission of Phd, Mphil Theses: कोविड - १९ महामारीमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने () एमफिल (M.Phil) आणि (Phd) करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता थिसीस सबमीट करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान यूजीसीने ३० जून २०२० पर्यंत असलेली थिसीस जमा करण्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली होती. आता ती पुन्हा ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा अतिरिक्त वेळ उमेदवारांना एव्हिडन्स ऑफ पब्लिकेशन आणि दोन कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहण्यासाठी देखील दिला जाऊ शकतो. मात्र पीएचडी, एमफिल करणाऱ्या उमेदवारांचा एकूण कालावधी मात्र पाच वर्षांचाच राहणार आहे, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यापीठे, महाविद्यालये गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनावर विद्यापीठांच्या प्रयोगशाळेत काम करता आलेले नाही, लायब्ररी सेवेचा वापर करता आलेला नाही. या गोष्टी संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतात, परिणामी ही मुदतवाढ देत असल्याचे यूजीसीने निवेदनात म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33KBgDB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments