SBI PO 2000: पदवीधर उमदेवारांना संधी; एसबीआयमध्ये भरती

SBI Probationary Officer (PO) Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार हे नोटिफिकेशन पाहू शकतात आणि अर्ज करू शकतात. १४ नोव्हेंबर २०२० पासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. खरे तर या भरतीबाबतचे नोटिफिकेशन आधी येणे अपेक्षित होते, मात्र करोना स्थितीमुळे त्यास विलंब झाला होता. ही भरती प्रक्रिया २०२० मधील रिक्त पदांसाठी आहे. अर्ज प्रक्रिया ४ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याच्या थेट लिंक्स देत आहोत. पूर्व परीक्षा ३१ डिसेंबर, २, ४ आणि ५ जानेवारी रोजी होईल. पूर्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा २९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. पात्रता उमेदवार पदवीधर हवेत. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू आहे. निवड प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. पूर्व परीक्षा १०० गुणांची एमसीक्यू पद्धतीची असेल. इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि रिझनिंग अॅबिलिटी वर ही परीक्षा आधारित असेल. मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल. अधिक माहितीसाठी उमेदावारांनी नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32IDDGp
via IFTTT

Post a Comment

0 Comments