'अशी' होणार अकरावी ऑनलाइन प्रवेशांची विशेष फेरी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पार पडल्यानंतरही मुंबई विभागातील सुमारे ७५ हजारहून अधिक विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी आजपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीसाठी एकूण १,१६,०८० विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, त्यापैकी ४५,४०२ विद्यार्थ्यांना कॉलजचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजे अर्ज केलेल्या सुमारे ७० हजार ६७८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. तिसऱ्या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. या फेरीआधी कोट्यातील रिक्त जागा ऑनलाइन प्रक्रियेत वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे या फेरीला जास्त जागा उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही प्रवेश फेरी २७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एका फेरीचे आयोजन केले जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. असे आहे वेळापत्रक २० डिसेंबर - रिक्त जागांची स्थिती जाहीर करणे २० ते २२ डिसेंबर - कॉलेजांचा पसंतीक्रम भरणे. २३ डिसेंबर - तांत्रिक प्रक्रियेचा दिवस २४ डिसेंबर - सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी जाहीर. २४ ते २६ डिसेंबर - विद्यार्थ्यांनी प्रेवश निश्चित करणे. २६ डिसेंबर - कॉलेजांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे २७ डिसेंबर - प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांची यादी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38lK7gF
via IFTTT

Post a Comment

0 Comments