स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CHSL 2020 परीक्षेच्या अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ

CHSL Exam 2020: कर्मचारी भरती आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल परीक्षा २०२० साठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यासंबंधी स्टाफ सिलेक्शन कमिशनने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर परिपत्रक जारी केले आहे. यानुसार आता उमेदवार २६ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी ही मुदत १९ डिसेंबर पर्यंत होती. ज्या इच्छुक उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते ssc.nic.in वर भेट देऊ शकतात. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत - २६ डिसेंबर २०२० ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर २०२० ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम तारीख - ३० डिसेंबर २०२० चलानच्या माध्यमातून शुल्क भरण्याची अंतिम तारीख - १ जानेवारी २०२१ LDC/ JSA, PA/ SA यासारख्या पदांवरील भरतीसाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातून १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी पर्यंतचं शिक्षण विज्ञान शाखेतून घेतलेलं असणं अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या परीक्षेच्या माध्यमातून ४,७२६ पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. SSC CHSL टिअर १ परीक्षा १२ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत होणार आहे. जे उमेदवार टिअर १ मध्ये यशस्वी होतील, ते टिअर २ साठी पात्र ठरतील. टिअर २ मध्ये यशस्वी होणारे उमेदवार टिअर ३ देतील टिअर ३ ही टायपिंग टेस्ट / स्कील टेस्ट आहे. अधिकृत सुचनेनुसार एसएससी सीजीएल परीक्षेचे नोटिफिकेशन २९ डिसेंबर २०२० रोजी जारी होईल. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी SSC 2020 परीक्षेचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LXrubl
via IFTTT

Post a Comment

0 Comments