Also visit www.atgnews.com
Syllabus Reduction:'या' राज्याने केली तब्बल ४८ टक्के अभ्यासक्रम कपात!
School Syllabus Cut 2020: करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. पण त्यातही प्राथमिक शिक्षणाचे जास्त नुकसान झाले आहे. ही मुले वयाने लहान असल्याने कोणतेही राज्य सरकार या मुलांच्या शाळा सुरू करण्याच्या मानसिकतेत नाही. केंद्र सरकारने देखील केवळ नववी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यास सशर्त परवानगी दिलेली आहे. अशात राजस्थान राज्य सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा अभ्यासक्रम तब्बर ४८ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जागतिक महामारी कोविड-१९ मुळे विद्यार्थ्यांना शिकवणे आणि अध्यापनाची प्रक्रिया निरंतर सुरू राहावी आणि विद्यार्थ्यांना शिकून पुढील वर्गात जाता यावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कमी करून तो ५२ टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' यासंबंधी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र गेली आहेत, मात्र, इयत्ता सहावीपासून पुढील वर्गांबाबतच्या अभ्यासक्रम कपातीविषयी कोणतीही माहिती नाही. दरम्यान, कोविड मुळे राज्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात कोविड स्थितीचा आढावा घेऊन मगच शाळा उघडण्यावर निर्णय होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36L0p38
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments