BARC त नोकरभरती; ३५ हजारांपासून ७९ हजारांपर्यंत मासिक वेतन

2021: भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. बीएआरसीने विकिरण चिकित्स संशोधन केंद्र (RMRC) कोलकाता आणि मुंबईत ६३ पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या या जाहीरातीनुसार बीएआरसी मध्ये ही विविध पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बीएआरसीचे अधिकृत संकेतस्थळ receuit.barc.gov.in वर उपलब्ध करून दिलेला ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २१ जानेवारी २०२१ पासून सुरु झाली आहे आणि उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांची माहिती -- मासिक वेतन वैज्ञानिक अधिकारी - ७८८०० रुपये आणि ६७,७०० रुपये टेक्निकल अधिकारी - ७८ हजार रुपये नर्स - ४४,९०० उपअधिकारी -३५,४०० रुयपे वैज्ञानिक सहाय्यक - ४४,९०० रुपये आणि ३५,४०० रुपये फार्मीसिस्ट - २९,२०० रुपये ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमेन - २१,७०० रुपये ट्रेनी - १६ ते १८ हजार रुपये आणि १०,५०० ते १२,५०० रुपये भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र आणि वरील नोकरीची संपूर्ण माहिती हवी असल्यास नोटिफिकेशन वाचावे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p7zmWd
via IFTTT

Post a Comment

0 Comments