जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर

JEE Advanced: आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. IIT मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. परीक्षेच्या सिलॅबससह पेपर १ आणि पेपर २ ची ऑनलाइन मॉक टेस्टही अपलोड करण्यात आली आहे. मॉक टेस्टचा सराव करण्यासाठी आणि संपूर्ण सिलॅबस डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. यंदा आयआयटी खरगपूर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन शनिवार ३ जुलै २०२१ रोजी करण्यात येणार आहे. पेपर -१ ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. जेईई अॅडव्हान्स्ड सिलॅबस २०२१ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह आर्किटेक्चर एप्टीट्यूड टेस्ट (AAT) चा अभ्यासक्रमदेखील जारी करण्यात आला आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ मध्ये प्रश्न विचारण्यात येतील. आपण पुढे दिलेल्या लिंक्स क्लिक करून सिलॅबस डाऊनलोड करू शकता - जेईई अॅडव्हान्स्ड मॉक टेस्ट २०२१ आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ च्या तयारीसाठी ऑनलाइन सराव करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेपर १ आणि पेपर २ दोन्हीसाठी ऑनलाइन मॉक टेस्ट जारी करण्यात आली आहे. पुढे दिलेल्या लिंक क्लिक करून तुम्ही सराव करू शकता. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qUyQvx
via IFTTT

Post a Comment

0 Comments