Also visit www.atgnews.com
पीएचडी प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ
Phd Entrance Test: मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी २८ जानेवारी, २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट परीक्षेचे आयोजन २८ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात येणार असल्याचे नवोप्रक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच ज्या इच्छूकांनी फेब्रुवारी आणि मार्च २०२० ला ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नसून त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यास ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ६५१२ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातून ६०५१ तर इतर राज्यातून ४६१ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. विद्याशाखानिहाय वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी ११४८, मानव्यविद्या १६९१, आंतरविद्याशाखा ३३३ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ३३४० एवढे अर्ज प्राप्त झाले होते. तर एमफील प्रवेश परीक्षेसाठी ३२६ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. ज्यामध्ये महाष्ट्रातून २२७ आणि इतर राज्यातून ४९ अर्ज प्राप्त झाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/399hEfI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments