पुण्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे पर्यंतचे वर्ग एक फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी करोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने गेली आठ दिवस याबाबत निर्णय घेतला नव्हता. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. हे वर्ग सुरक्षितपणे सुरू असून, टप्प्याटप्प्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्याही कमी झाली असून, सध्या स्थिती नियंत्रणाखाली आल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. त्यामुळे शाळांमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याला सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांनी शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू होतील, याची दक्षता घ्यावी असेही अध्यादेशात म्हटले आहे. महापालिका प्रशासनाने या शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार आज शुक्रवारी पालकमंत्री पवार यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने अनलॉक चा निर्णय घेतला असून शाळाही सुरू करण्यास अडचणी नसल्याबाबत बैठकीत एकमत झाले. त्यानुसार एक फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य सरकारने जरी 27 जानेवारी रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, शाळांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळावा म्हणून पुणे महापालिका हद्दीतील हे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oeW6mc
via IFTTT

Post a Comment

0 Comments