JEE Main 2021: अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस

परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शनिवार २३ जानेवारी हा अखेरचा दिवस आहे. परीक्षेचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी शनिवारी अॅप्लिकेशन विंडो बंद करणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही ते अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे. विद्यार्थ्यांनी https://ift.tt/30JsKjS या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. विद्यार्थी एका किंवा एकापेक्षा अधिक टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात. त्यांचे सर्वोतम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान, JEE Main 2021 साठी अर्जात दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी २७ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा विंडो ओपन होणार आहे. दुरुस्तीसाठी अखेरची मुदत ३० जानेवारी २०२१ आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. पॅटर्नमध्ये बदल विविध राज्यांनी बारावी बोर्ड परीक्षांच्या अभ्यासक्रम कपातीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले होते. त्यामुळे या सामायिक परीक्षेत नेमके कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. तीही दूर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ९० प्रश्न विचारले जातील, त्यापैकी ७५ प्रश्नांचीच उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. त्यामुळे या ९० प्रश्नांमध्ये सर्व प्रकारचा अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. शिवाय १५ वैकल्पिक प्रश्नांमध्ये नकारात्मक गुणही नसणार आहेत. १३ भाषांमध्ये होणार परीक्षा देशात पहिल्यांदाच जेईई मेन परीक्षा १३ भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. इंग्रजीसह हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, गुजराती, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दू या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p9p484
via IFTTT

Post a Comment

0 Comments