Also visit www.atgnews.com
FYJC Online: प्राधान्य फेरीचे वेळापत्रक जाहीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई आणि महानगर परिसरातील ज्युनिअर कॉलेजांत अकरावीच्या जवळपास सव्वा लाख जागा रिक्त आहेत. तर सुमारे १५ हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेशफेरी सुरू करण्यात आली आहे. अकरावीच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या अशा एकूण पाच फेऱ्यांनंतर मुंबई आणि परिसरातील कॉलेजांमध्ये एक लाख ९६ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी मुंबई आणि महानगर परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीच्या एक लाख २४ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार नऊ टप्प्यांत या फेरीतील प्रवेश करण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, अर्ज न केलेले विद्यार्थी किंवा प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले, मिळालेले प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील. अकरावीला प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असणार आहे. प्रवेश प्रक्रिया कशी? १३ ते १५ जानेवारी - ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी १६ ते १८ जानेवारी - ८० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी १९ आणि २० जानेवारी - ७० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी २१ आणि २२ जानेवारी - ६० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी २३ ते २५ जानेवारी - ५० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी २७ आणि २८ जानेवारी - दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी २९ आणि ३० जानेवारी - एटीकेटी मिळालेले विद्यार्थी प्रवेश आणि रिक्त जागांची स्थिती शाखा -- उपलब्ध जागा -- प्रवेश -- रिक्त जागा कला -- ३७,३०० -- १९,३४६ -- १७,९५४ वाणिज्य -- १,७३,५२० -- १,११,२११ -- ६२,३०९ विज्ञान -- १,०३,९१० -- ६३,३०० -- ४०,६१० एचएसव्हीसी -- ५,६६० -- २,२७९ -- ३,३८१ एकूण -- ३,२०,३९० -- १,९६,१३६ -- १,२४,२५४
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38AZT8x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments