Also visit www.atgnews.com
दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती
RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने () सुरक्षा रक्षक पदांसाठी (security guard) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सुरक्ष रक्षकाच्या २४१ पदांवर ही भरती प्रक्रिया होणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. उमदेवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होणार आहे. महत्त्वाच्या तारखा - ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २२ जानेवारी २०२१ ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अखेरची मुदत - १२ फेब्रुवारी २०२१ ऑनलाइन लेखी परीक्षा - फेब्रुवारी ते मार्च २०२१ या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. पदांची प्रवर्गनिहाय संख्या - सर्वसाधारण - ११३ ओबीसी - ४५ ईडब्ल्यूएस - १८ एससी - ३२ एसटी - ३३ २४१ पदांपैकी महाराष्ट्रातील पदे - मुंबई - ८४ नागपूर - १२ आवश्यक पात्रता सिक्युरिटी गार्ड पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार माजी सैनिक असायला हवेत. या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे किमान वय २५ वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा २८ वर्षे तर अनुसूचित जातीजमातीसाठी ३० वर्षे आहे. कमाल वयोमर्यादा सर्व प्रवर्गांसाठी ४५ वर्षे आहे. निवड प्रक्रिया सिक्युरिटी गार्ड पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. लेखी परीक्षेत रिजनिंग, इंग्लिश, न्यूमरिकल अॅबिलिटीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. परीक्षेत नकारात्मक गुणांकन नसेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल. वेतन साठी निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन म्हणून १०,९४० रुपये मासिक वेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त अन्य भत्ते लागू असतील. मूळ वेतन आणि अन्य भत्ते मिळून महिन्याचे सुरुवातीचे वेतन २७,६७८ रुपये असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oc2udC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments