MBA PG अभ्यासक्रमांसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जारी

MAH CET MBA Counselling 2020: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (CET Cell) ने राज्यातील विद्यापीठ आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये २०२०-२१ मध्ये व्यवस्थापन पीजी अभ्यासक्रमांच्या (MBA, MMS) प्रवेशासाठी आयोजित सामायिक प्रवेश परीक्षा २०२० च्या काऊन्सेलिंग अंतर्गत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जारी केली आहे. सीईटी सेलने जारी केलेली ही यादी () सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर वर ३ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आली आहे. जे उमेदवार एमबीए आणि एमएमएस कोर्सेससाठी आयोजित काऊन्सेलिंग प्रक्रियेत सामील झाले होते, ते आपला अॅप्लिकेशन आयडी आणि नाव आदी माहिती देऊन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहू शकतील. MBA अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी ७ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांनी आपले नाव किंवा अॅप्लीकेशन आयडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी. तेथे पीजी कोर्सेसच्या विभागात एमबीए/एमएमएस शी संबंधित लिंक वर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर ऑल इंडिया किंवा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जारी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट च्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर संबंधित मेरिट लिस्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये उघडेल. या उमेदवार आपला अॅप्लीकेशन आयडी किंवा नाव तपासू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oarjre
via IFTTT

Post a Comment

0 Comments