आई-वडिलांसोबत डोक्यावर भाजी विकणारा मुलगा UPSC परीक्षेत देशात आठवा

सूर्यकांत आसबे, सोलापूर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही कामात अपयश येत नाही हे दाखवून दिले आहे , सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावच्या एका जिद्दी तरुणाने. आई-वडिलांसोबत बारावीपर्यंत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणाऱ्या या पठ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.आणि तडवळे गावच्या ग्रामस्थांची मान उंचावली आहे. शरण ( राहणार तडवळे , तालुका बार्शी ) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठवा क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.मुलाला अधिकारी बनविण्यासाठी अहोरात्र मजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी मात्र आपल्या कास्ताचे सार्थक झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. गोपीनाथ कांबळे यांना जेमतेम दीड एकर शेती आहे. आई-वडिलांसोबत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणारा शरण हा लहान मुलगा. दोन मुलांपैकी मोठा मुलगा दादासाहेब अभियंता झाला आहे. तर लहान मुलगा शरण हा अभियंता पदाची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. शरण याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशालेत , बारावीचे शिक्षण वैरागच्या विद्या मंदिरात आणि २०१६ साली सांगली येथील वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग येथे बी टेक चे शिक्षन पूर्ण केले आहे. २०१८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगरूर येथून मास्तर ऑफ टेक्नॉलॉजी या विषयाची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका कंपनीमध्ये सुमारे २० लाखांच्या पॅकेजची नौकरी नाकारून शरण याने आई सुदामती व वडील गोपीनाथ यांच्या काबाड कष्ठाचे चीज व्हावे म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने तब्ब्ल १८ ते २० तास अभ्यास करून शरण याने २०१९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि शनिवारी जाहीर झालेल्या निकालाने कांबळे कुटुंबाला आनंदाची बातमी मिळाली. गावकऱ्यांना समजताच फटाक्यांची आतषबाजी करत गावकरी व मित्र परिवाराने कांबळे कुटुंबियांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. शरण याने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रथमच दिलेल्या परीक्षेत बाजी मारली आहे. सेंट्रल आम्रड पोलीस फोर्सद्वारे विविध दलांमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाते. शरण हा सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेत देशात आठवा आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ,सेंट्रल रिझर्व्ह पोळी फोर्स सीआरपीएफ,सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सीआयएसएफ,इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस आयटीबीपी आणि सशस्त्र सीमा बल एसएसबी या दलामध्ये निवड करण्यात येते. दरम्यान मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले अपार कष्ट कामाला आल्याची भावना आई आणि वडीलांनी व्यक्त केली आहे. तर आई-वडील व मोठ्या भावाच्या भक्कम पाठिंब्यामुळे आपण या परीक्षेत यश मिळवू शकलो असे याने सांगितले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YTFZ2W
via IFTTT

Post a Comment

0 Comments