पार्ले टिळक शाळेत साकारले रंजक भूगोल दालन

मुंबई : भूगोल म्हटले की नकाशे, लोकसंख्येची आकडेवारी, जमीन, अवकाशाची वैशिष्ट्ये आदी बाबी आपल्या समोर येतात. पाठांतर करून उत्तरे लिहिण्याचा विषय असा सर्वसाधारण समज या विषयाबद्दल आजही कायम आहे. मात्र या विषय किती रंजक आहे हे विलेपार्ले येथील भूगोल दालनाला भेट दिल्यावर लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू या सृष्टीच्या चार गोष्टींची संकल्पना घेऊन हे दालन विकसित करण्यात आले आहे. दालनात प्रवेश करताना अवकाशाचा भास व्हावा, अशी भिंत रंगविण्यात आली आहे. या भिंतीवर आकाशगंगा, धूमकेतू, सूर्यकिरण असा प्रवास करत आपण जमिनीच्या दिशेने येतो. यात ढग, विजा हेही चित्रित करण्यात आले आहे. यानंतर खाली एक डोंगर, नदी, शेती आदी जमिनीवरील गोष्टी दाखविणारा मोठा देखावा आहे. यामध्ये पाणी प्रवाहित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना नेमके आपले जलचक्र कसे आहे हे समजू शकणार आहे. अंतराळाबद्दल माहिती देण्यासाठी भिंतीवर पृथ्वीच्या आकाराचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यावर प्रोजेक्टरच्या साह्याने अवकाश जगताशी संबंधित विषय शिकविले जाऊ शकतात. याच बाजूला विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी रॉकेटची प्रतिकृतीही आहे. रॉकेट प्रक्षेपित करताना सोबत असलेले बांधकाम हुबेहुब साकारण्यात आले आहे. या दालनात एकावेळी सहा विद्यार्थी उभे राहू शकतील, अशा प्रकारचे षटकोनी टेबल तयार करण्यात आले असून, त्यामध्ये खाली कम्प्युटर दिला आहे. तो फिरत्या ट्रॉलीवर ठेवण्यात आला आहे. यात विशेष कॅमेरा देण्यात आला आहे. जो दालनातील एखाद्या नकाशावर ठेवला असता मोठ्या स्क्रीनवर आणि विद्यार्थ्यांच्या टेबलखाली दिलेल्या कम्प्युटरवर दिसणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना समजणे सुलभ होणार आहे. मराठी, गणित, चित्रकला, संगीत दालन विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळेमध्ये मराठी विषयाचे स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. ज्यामध्ये भाषेसाठी आवश्यक श्रवण, कथन, संभाषण आणि वाचन या तीन गोष्टींचे चित्र काढण्यात आले असून, विद्यार्थ्यांना तेथे बसून वाचनाची इच्छा व्हावी, असे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय विविध भूमितीय आकार असणाऱ्या टेबलचे गणित दालन, चित्रकला दालन आणि संगीत दालन विद्यार्थ्यांना या विषयांकडे आकर्षित करत आहेत. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YQLLCt
via IFTTT

Post a Comment

0 Comments