महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगारासाठी कोणती तरतूद...वाचा

महाराष्ट्र सरकारचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी ८ मार्च रोजी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे येथे तयार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ---- अन्य कोणकोणत्या तरतुदी शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने केल्या आहेत ते पाहू... - सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार तसेच अमरावती, परभणी येथे नवी शासकीय महाविद्यालये. - कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणार. युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार. - जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी तीन हजार कोटींची तरतूद - मुलींच्या शिक्षणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय - राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना एसटी बसमधून मोफत प्रवासाची मुभा देण्याची घोषणा. - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने ही मुलींच्या प्रवासाची योजना राबवली जाईल. त्यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध करून देणार - शहरातील महिलांसाठी तेजस्वीनी योजनेंतर्गत आणखी बस उपलब्ध करून देणार. -- राज्य राखीव पोलीस दलात पहिलीच महिला पोलीसांची तुकडीची घोषणा - राज्यातील चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद. राज्यभरात अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटीका केंद्र सुरू करणार


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30jLF7a
via IFTTT

Post a Comment

0 Comments