Also visit www.atgnews.com
JEE Main 2021: मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जारी
JEE Main 2021: संयुक्त प्रवेश परीक्षा () मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केली आहे. उमेदवार आन्सर की अधिकृत वेबसाइट आणि nta.ac.in च्या माध्यमातून डाउनलोड करू शकतात. फायनल आन्सर की जारी झाल्यानंतर जेईई मेन मार्च सत्राचा निकालही लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध होईल आणि उमेदवार आपल्या लॉग इन क्रेडेंशियलच्या मदतीने आपला स्कोअर डाउनलोड करू शकतील. जेईई मेन मार्च सत्र की परीक्षेची फायनल आन्सर की मध्ये परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात आली आहेत. यानंतर एनटीएने प्रोव्हिजनल आन्सर की आंसर की जारी केली होती आणि विद्यार्थ्यांनी त्यावर हरकती उपस्थित करण्यासाठी परवानगी दिली होती. JEE Main 2021 March Final Answer Key: अशा पद्धतीने डाउनलोड करा... - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in वर ज. - यानंतर फायनल आन्सर की पर्यायावर क्लिक करा. - आता तुम्ही आन्सर कीची पीएफ फाइल डाऊनलोड करू शकाल. जेईई मेन मार्च सत्रासाठी एकूण ६,१३,६३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सहा शिफ्टमध्ये ३३४ शहरातील परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली. यापैकी १२ शहरे देशाबाहेरची होती. एनटीए एप्रिल आणि मे 2021 मध्ये आणखी दोन सत्रांमध्ये प्रवेश परीक्षा आयोजित करणार आहे. ऑल इंडिया रँक लिस्ट एकत्र करून मे सत्राच्या वेळी निकाल जाहीर केले जातील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vT3hFB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments