Also visit www.atgnews.com
MPSC परीक्षा येत्या दहा दिवसात; तारीख शुक्रवारी होणार जाहीर: CM
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही तारीख शुक्रवारी १२ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत जाहीर केली जाणार आहे. राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. येत्या रविवारी ही परीक्षा होणार होती, पण वाढत्या करोना संक्रमणामुळे राज्य लोकसेवा आयोगाने ती लांबणीवर टाकली. याचे राज्यभर उमेदवारांमध्ये तीव्र पडसाद राज्यात उमटले. विद्यार्थ्यांच्या भावनांशी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलत आहोत. शुक्रवारी आयोगामार्फत ही तारीख जाहीर केली जाणार आणि ही तारीख येत्या आठवड्याभरातच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले हजारोंच्या संख्येने उमेदवार रस्त्यावर उतरू लागले. पुण्यातून या उद्रेकाला सुरूवात झाली. तेथे उमेदवारांनी रास्ता रोको केला. त्यानंतर कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव येथेही उमेदवारांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत नाराजीचा सूर लावला. परीक्षेची तारीख ठरवली तेव्हा आयोगाने विचारले नव्हते: तनपुरे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले की, 'राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली तेव्हा आपत्ती व्यवस्थापन खात्याला विचारले नव्हते. आता करोनाची स्थिती वाढत असताना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असे वाटल्याने आयोगाने आम्हाला याबाबत विचारले.' एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही? एकीकडे आठवडाभरापूर्वी आरोग्य विभागाची भरती परीक्षा झाली, यूपीएससी, जेईई, बँकिंग अशा सर्व परीक्षा होत असताना केवळ एमपीएससी पूर्व परीक्षाच लांबणीवर का टाकण्यात येत आहे, असा संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल होता. एमपीएसी परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी झाले, मार्गदर्शक सूचना आल्या आणि आयत्या वेळी परीक्षा स्थगित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाला तोंड फुटले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qAxuW8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments