Also visit www.atgnews.com
राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ३० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. डेहराडून येथील लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षा पाच जूनला होणार आहे. त्यासाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज स्विकृतीची प्रक्रिया होणार होती, परंतु देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थी, पालकांना अर्ज भरण्यास येणाऱया अडचणी लक्षात घेत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. याबाबत परीक्षा परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवेशपात्रता परीक्षा पाच जून रोजी होणार आहे. सध्या देशात व राज्यात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउनची परिस्थितीचा विचार करून परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aEOHZ5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments