'वॉर रूम'मुळे परीक्षा सुरळीत; तांत्रिक अडचणींवर पुणे विद्यापीठाची मात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सावित्रीबाई फुले ामार्फत सुरू असलेल्या पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अल्प प्रमाणात अडथळे येत आहेत. परीक्षेच्या नियोजनापूर्वी विद्यापीठामार्फत सज्ज केलेल्या 'वॉर रूम'मुळे या अडचणी कमी झाल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत देण्यात आली. विद्यापीठामार्फत ११ एप्रिलपासून ऑनलाइन प्रॉक्टर्ड मेथडने परीक्षांना सुरुवात झाली. सुमारे सहा लाख विद्यार्थी ३८ लाख वेळा विविध विषयांसाठी ही परीक्षा देणार असून, आतापर्यंत जवळपास तीन ते साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी १२ लाख विषयांसाठी ही परीक्षा दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांनी दिली. काही किरकोळ तक्रारी वगळता विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी या परीक्षेदरम्यान आलेल्या नसून, प्राप्त तक्रारी वॉर रूमच्या माध्यमातून तत्काळ निकाली काढल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठामार्फत ७५ तज्ज्ञांची वॉर रूम सज्ज ठेवण्यात आली असून, ४० जण हेल्पसेंटर व चॅटबॉक्सचे काम पाहत आहेत, तर उर्वरीत ३५ जण पेपर आणि उत्तरपत्रिकेशी संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे परीक्षेचे कामकाज सुरळीत होण्यास मदत झाली आहे. विद्यापीठामार्फत नुकतेच काही विषयांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन विद्यापीठामार्फत महाविद्यालयांना करण्यात आला आहे. स्लॉटची संख्या वाढविली गेल्या वर्षी सर्व्हरवर लोड आल्याने अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. हे लक्षात घेत यंदा परीक्षेसाठी स्लॉटची संख्या वाढविण्यात आली. एका स्लॉटमध्ये ३० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली. तसेच एका दिवशी जास्तीत जास्त १५० पेपर येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरून घेण्यापासून काटेकोर नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे परीक्षेच्या माध्यमामध्ये गोंधळ झाला नाही. परीक्षेबाबतची माहिती, व्हिडीओ, मॉक टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकडेही यावेळी विशेष लक्ष दिले. तसेच पेपर सेट झाल्यानंतरही प्रश्न योग्य व विषयाशी संबंधित आहेत की नाही याची दोन-तीन वेळा खात्री करण्यात आली. - डॉ. महेश काकडे, परीक्ष नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2R2EONU
via IFTTT

Post a Comment

0 Comments