Also visit www.atgnews.com
आंध्र प्रदेशात दहावी, बारावीसह सर्व परीक्षा नियोजित वेळेत
देशातल्या वाढत्या करोना कहराच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील रद्द करण्याचा किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे, सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेत घेणार आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की बोर्ड परीक्षांच्या (AP SSC, Inter Board Exam 2021) वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दुसरीकडे सोशल मीडियावर विद्यार्थी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. दहावी, बारावी परीक्षांसोबतच आंध्र प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे की डिग्री आणि इंजीनिअरिंग परीक्षा देखील राज्यात दिलेल्या शेड्युल नुसार आयोजित केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सर्व कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करत परीक्षांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या सद्यस्थितीवर एक उच्चस्तरीय आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीत त्यांनी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन करण्याचे आदेश दिले. राज्यातील टीडीपी, भाजप, जन सेना आणि काँग्रेस या सर्व विरोधी पक्षांनी परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्याची मागणी केली आहे. विशेषत: दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, कारण कोविड संक्रमणाने टोक गाठले आहे. दरम्यान, राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटाच्या २.०४ कोटी लोकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री रेड्डी यांनी घेतला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3expG3v
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments