Also visit www.atgnews.com
आयबी बोर्डाच्या भारतातील शाळांमधील परीक्षा रद्द
IB Exams Cancelled: इंटरनॅशनल बॅकलॉरेट अर्थात IB बोर्डाने भारतातील बोर्डाच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. भारतात बोर्डाशी संलग्न १८५ शाळा आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील शाळांमध्ये प्रवेश हवा असतो किंवा ज्यांच्या पालकांच्या परदेशात बदली होत असतात, अशा पालकांची मुले या बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेशाला प्राधान्य देतात. बोर्डाच्या सर्क्युलरनुसार, भारतातील डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या, करिअर अभ्यासक्रमांच्या आणि मध्य वार्षिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीत. आयबी बोर्डाने शाळांना आपला भारतात परीक्षा न घेण्याचा निर्णय कळवला आहे. कोविड-१९ मुळे या परीक्षा होणार नाहीत. याबाबत शाळांशी सल्लामसलत सुरू असल्याचे बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे. मूल्यांकन कसे? भारतातील आयबी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे कोर्सवर्कचे गुण आणि मे २०२१ सत्राची संभाव्य श्रेणी त्यांना बहाल करणअयात येतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी त्यांच्या शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहन बोर्डाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ggXmoi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments