Also visit www.atgnews.com
दहावीचा 'निकाल' आज? दोन वर्षांच्या शालांतर्गत गुणांनुसार मूल्यमापन?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, याबाबत संभ्रम कायम आहे. राज्य सरकरच्या पातळीवर विविध पर्याय चाचपडले जात असून, दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा त्यांचा शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या शाळांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या आधारे जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात चर्चा झाली असून, शुक्रवारी (२८ मे) अंतिम चर्चेनंतर निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले जाणार आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची घडीच विस्कटली असून, ऑनलाइन प्रणालीत परीक्षा घेणे अवघड झाले आहे. यामुळे राज्य सरकारकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांआधारे जाहीर करणार याबाबत चर्चा सुरू झाली. यासाठी सरकारने तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने पुन्हा परीक्षा होणार की अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर होणार, याबाबत चर्चा सुरू झाली. या चर्चेवर शुक्रवारी पडदा पडण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांची गुरुवारी बैठक पार पडली. यामध्ये इयत्ता दहावीचा निकाल कसा लावावा, याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत राज्य शिक्षण विभागाचे महत्त्वाचे अधिकारी आणि राज्याचे महाधिकवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणीही उपस्थित होते. या वेळी दहावीचे मूल्यांकन करताना सीबीएसईने ज्या प्रमाणे सूत्र तयार केले आहे, त्याचप्रमाणे राज्य शिक्षण मंडळानेही सूत्र तयार केल्याचे सूत्रांकडून समजते. यात विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये असताना पार पडलेल्या शालेय परीक्षा तसेच, दहावीत पार पडलेल्या शालेय परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. शिक्षण विभागाने शाळांकडून मागविलेल्या माहितीमध्ये काही अत्यल्प शाळा वगळता बहुतांश शाळांनी विविध वर्षभरात ऑनलाइन शिक्षणात विविध प्रकारे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले आहे. त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याचेही सूत्रांकडून समजते. गुरुवारी झालेल्या बैठकीत काही अंतिम निर्णय झाला नाही; यामुळे शुक्रवारी (२८ मे) पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध होईल तसेच, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असेही सूत्रांकडून समजते. - मुख्यमंत्र्यांशी अंतिम चर्चा झाल्यानंतर घोषणा - नववी, दहावीच्या अंतर्गत परीक्षांआधारे गुण देण्याबाबत विचार - निर्णयानुसार उच्च न्यायालयातही पतिज्ञापत्र सादर करणार बारावीबाबतही विचार होणार केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांची रविवारी बैठक घेतली होती. यात बारावी परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी सूचना करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रासह बहुतांश राज्यांनी बारावी परीक्षा नको, अशी भूमिका मांडली होती. याबाबतही अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. यावरही शुक्रवारच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34oDZT5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments