Also visit www.atgnews.com
करोनात विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आरोग्य विमा कवच?
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनाच्या लाटेचा फटका बहुतांश विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी योजना सुरू करावी, अशी मागणी युवा सेनेने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या उपस्थित पार पडलेल्या ऑनलाइन बैठकीत याबाबत एक समिती नेमून याची सुरुवात मुंबई विद्यापीठापासून करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील कॉलेजांतील विद्यार्थ्यांना अपघाती विमा सुरक्षा देण्यात येते. याचप्रमाणे सध्याच्या करोनाकाळात त्यांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ द्यावा, अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिकाधिक तरुणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे सामंत यांना युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, शीतल देवरूखकर-शेठ, निखिल जाधव यांनी निवेदन देऊन विद्यार्थ्यांना आरोग्य विमाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. सर्व विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी विशेष कुलगुरू निधी तसेच विद्यापीठ आपत्कालीन निधी यामधून ठराविक रक्कम मंजूर करण्याची मागणीही युवा सेनेने केली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी करोना आजार व इतर आजारांसाठी चांगली विमा योजना सुरू करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. या समितीने केलेल्या सूचनांनुसार सर्वप्रथम मुंबई विद्यापीठामध्ये ही विमा योजना सुरू करावी व याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यानंतर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्याचे सावंत यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hXkU2h
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments