NATA 2021: दुसऱ्या नाटा परीक्षेचे वेळापत्रक जारी

2021: काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर () ने दुसऱ्या नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) 2021 परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. ही परीक्षा यापूर्वी १२ जून रोजी होणार होती, पण देशभरातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संक्रमण स्थितीमुळे परीक्षा ११ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा आता ११ जुलै रोजी होणार आहे. परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया मार्चमध्ये सुरू झाली होती आणि ती ३० जूनपर्यंत जारी राहणार आहे. अॅप्लिकेशन फॉर्म करेक्शन विंडो २० जून ते ३० जून २०२१ या कालावधीत उपलब्ध राहील. अॅडमिट कार्ड कधी होणार जारी? अधिकृत माहितीनुसार, NATA सेकंड टेस्टसाठी अॅडमिट कार्ड ७ जुलै रोजी जारी केले जातील आणि १५ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. संशोधित माहिती पुस्तिका, अर्जाचा फॉरमॅट NATA ची अधिकृत वेबसाइट nata.in आणि परिषदेची वेबसाइट coa.gov.in वर उपलब्ध आहे. काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने आधी NATA परीक्षा १० एप्रिल रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. याचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. उमेदवार एक किंवा दोन्ही परीक्षा देऊ शकतात. जे दोन्ही परीक्षा देतात त्यांना प्रत्येक परीक्षेचे वेगवेगळे स्कोअरकार्ड मिळते. अशा उमेदवारांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fpQMuU
via IFTTT

Post a Comment

0 Comments