BEd Course :'असे' मिळवा ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र, सर्व कोर्सेची माहिती जाणून घ्या

BEd Course:शिक्षण संबंधित क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी बीएड अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. तुम्हाला शिक्षक बनायचे असल्यास बीएडची डिग्री आवश्यक आहे. सध्या देशात दिवसेंदिवस शाळांची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित शिक्षकांची गरज खूप आहे. पदवी आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना टीजीटी पदवी दिली जाते. तुम्ही पदव्युत्तर कोर्स केलाय आणि बीएड देखील पूर्ण केले असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (पीजीटी) बनू शकता. आधी एक वर्षाचा होता. जो आता दोन वर्षांचा करण्यात आला आहे. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम देखील सुरू आहे. हा कोर्स रेग्युलर किंवा ओपन अॅण्ड डिस्टन्स लर्निंग (ODL)माध्यमातून पूर्ण केला जाऊ शकतो. तसेच अनेक वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही शॉर्ट टर्म ऑनलाईन टिचर ट्रेनिंग ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स देखील करु शकता. Coursera, Udemy, Future learn या ऑनलाइन लर्निंग वेबसाइटच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र देखील मिळेल. वेबसाइट आणि ऑनलाईन कोर्स डिटेल्स जाणून घ्या Udemy:ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स गाइड (२ तास) Coursera:लर्निंग टू टीच ऑनलाईन, टीचिंग कॅरक्टर अँड क्रिएटिंग पॉझिटिव्ह क्लासरूम (१ ते ३ महिने) FutureLearn: इम्बेडिंग मेंटल हेल्थ इन करिकुलम (१२ आठवडे) edX:लीडिंग एजुकेशनल इनोव्हेशन अँड इम्प्रूव्हमेंट (१० महिने) बीएडसाठी टॉप डिस्टन्स लर्निंग विद्यापीठ १) अन्नामलाई विद्यापीठ २) मदुराई कामराज विद्यापीठ ३) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ४) कुरुक्षेत्र विद्यापीठ ५) काकतीय विद्यापीठ टॉप ५ खुली विद्यापीठं १) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ २) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ३) कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ५) नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी पात्रता विद्यार्थ्यांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमधून बीए (बॅचलर ऑफ आर्ट्स) / बीकॉम (बॅचलर ऑफ कॉमर्स) / बीएससी (बॅचलर ऑफ सायन्स) किंवा इतर कोणती पदवी आवश्यक आहे. पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iGFYdX
via IFTTT

Post a Comment

0 Comments