12th Board Exams बारावी बोर्ड परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी

बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी १७ जून रोजी सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जाणार याबाबतही यावेळी कोर्ट निर्देश देऊ शकते. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केला आहे. दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS)च्या ऑफलाइन परीक्षांबाबतच्या याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. न्या. ए.एम. खानविलकर आणि दिनेश महेश्वरी यांचे खंडपीठ गुरुवारी या याचिकांवर सुनावणी घेईल. ज्या ज्या राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तेथील ज्या विद्यार्थ्यांना बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)प्रवेशाच्या फॉर्म्युलासाठी समिती नेमावी, तसेच जेथे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, त्या राज्यांना तसे निर्देश द्यावेत, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. अॅड. अनुभा श्रीवास्तव सहाय आणि अन्य सात जणांनी विविध २३ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेश आणि तीन देशांमधील ४७ विद्यार्थ्यांच्या वतीने याचिका दाखल केल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी ही सर्वोच्च न्यायालयातील तिसरी याचिका आहे. दरम्यान, मागील सुनावणी वेळी सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाला बारावी मूल्यांकनाबाबतचे धोरण ठरवण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला होता. त्यामुळे हे दोन्ही बोर्ड गुरुवारी मूल्यांकन धोरण सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cMHsQ1
via IFTTT

Post a Comment

0 Comments