Also visit www.atgnews.com
कसा तयार होणार बारावीचा निकाल? 'या' आहेत काही शक्यता
बारावीच्या परीक्षा होणार की नाही या संभ्रमावर आता पुरता पडदा पडला आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. आता प्रश्न उपस्थित होत आहे तो या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार आणि निकाल कशा पद्धतीने तयार केला जाणार याचा. बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील खूप महत्वाचे वर्ष असते. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी बारावीचेच गुण ग्राह्य धरले जातात मात्र यंदा परीक्षाच रद्द झाल्यामुळे हे गुण कसे दिले जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर सीबीएसई बोर्डाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर निकाल तयार करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रातील दहावी बोर्ड परीक्षांचा निकालही ५० टक्के दहावीच्या गुणांवर तर ५० टक्के नववीच्या गुणांवर आधारलेला असेल, अशा पद्धतीने योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचा निकालही याच पद्धतीने तयार होण्याची शक्यता आहे. हे असू शकतात पर्याय - नववी ते अकरावीच्या गुणांवर आधारीत बारावीचा निकाल लावणे. - वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर अंतर्गत मूल्यमापन करणे. - दहावीचे गुण आणि बारावीची कामगिरी यांचे एकत्रीकरण करून गुणांकन करणे. - सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून प्रवेश परीक्षांवर अधिक भर देणे. सीबीएसईने बारावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातही बारावीची परीक्षा होणार नाही, असे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. करोनाची सध्याची परिस्थिती आणि मुलांमधील वाढता प्रार्दुभाव; तसेच परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. शिवाय केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसूत्री धोरण निश्चित करावे, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vN0Wvl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments