Also visit www.atgnews.com
JIPMAT परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जॉइंट इंटिग्रेशन प्रोग्राम इन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्टच्या (JIPMAT) परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जम्मू आणि बोधगया येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (IIM) प्रवेश घेता यावा, यासाठी पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची सुधारित तारीख एनटीए लवकरच जाहीर करणार आहे. .nta.ac.in आणि www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक, अॅडमिट कार्डाची माहिती देण्यात येईल. इच्छुक विद्यार्थी आत ३० जून २०२१ पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी एकदा अर्ज प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली होती. ही मुदत ३१ मे रोजी संपली होती. उमेदवार जॉइंट इंटिग्रेशन प्रोग्राम इन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्टचे अधिकृत संकेतस्थळ jipmat.nta.ac.in वर जाऊन त्यांचे ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर त्या दिवशी रात्री ११.५० वाजेपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याशिवाय ज्या उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज भरले आहेत, त्यांना त्यांच्या अर्जात परीक्षा केंद्र, शहर आदींबाबतचे बदल करायचे असतील तर ते ५ जुलै ते १० जुलै २०२१ या कालावधीत करता येणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी अशी आहे पात्रता - १. बारावी उत्तीर्ण आणि किमान ६० टक्के गुण अपेक्षित २. बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी (निकालानंतर ६० टक्के गुण मिळवणे अपेक्षित) ३. कोणत्याही बोर्डातून अथवा कोणत्याही विषयातून बारावी उत्तीर्ण होणे अपेक्षित देशातील ७६ शहरांमध्ये ही परीक्षा संगणकाच्या आधारे घेतली जाणार असून, या ७६ शहरांतील सेंटरची यादी वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी आपल्या जवळच्या कोणत्याही सेंटरवरून ही परीक्षा देऊ शकणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vJ8S0G
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments