शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम असा असेल,शिक्षण विभागाने दिली माहिती

online course:राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी शाळेमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कसा असेल ? पाठ्यपुस्तकं कशी मिळतील ? उपक्रम कसे राबविले जातील ? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. शिक्षण विभागाने यावर माहितीपत्रक काढून सर्व शंकांचे निरसन केले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके घरपोच दिली जाणार आहेत. तसेच ई स्वरुपामध्ये ebalbharati.in वर देखील पुस्तके उपलब्ध असणार आहेत. १५ जूनपासून दैनिक अभ्यासमाला सुरु होणार आहे. पहिली ते दहावीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका बनविण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सएपच्या माध्यमातून मराठी, गणित आणि विज्ञान विषयाचे प्रश्न उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. डी.डी सह्याद्री वाहिनीवरुन ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत १४ जूनपासून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज ५ तासांचे प्रक्षेपण होणार आहे. ज्ञानगंगा नावाने तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचे एकूण १२ इयत्तेनुसार शैक्षणिक चॅनल जिओ टीव्हीवर उपलबध असणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन मंडळाच्या यूट्यूब चॅनलवरुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञांचे दररोज मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. सुरु झाले तरी ऑनलाईन शाळा भरणार असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात शिक्षणविभागाने निर्देश जाहीर केले आहेत. तसेच शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. उपस्थिती अनिवार्य पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती शाळांमध्ये अनिवार्य असणार आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखील शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक राहणार आहे. सध्या दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. ठराविक वेळेत हा निकाल जाहीर होणे गरजेचे असल्याने संबंधित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pSwXQq
via IFTTT

Post a Comment

0 Comments