New Academic Year :आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात,शिक्षकांसाठी शाळेत उपस्थिती अनिवार्य

School Started:राज्यातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विविध शैक्षणिक कार्यक्रमांनी याची सुरुवात होणार आहे. आजपासून ऑनलाइन सुरु झाले आहे. यामध्ये पहिली ते नववी शिक्षकांची ५०टक्के उपस्थिती असणार आहे तर उर्वरित इयत्तेत शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक असेल असे सांगण्यात आले आहे. राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. तसेच त्यांनी सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. विदर्भ वगळता राज्यातील शैक्षणिक वर्ष आज (१५ जून) पासून सुरु झाले आहे. विदर्भासाठी २७ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे त्यानंतर विदर्भाचे शैक्षणिक वर्ष सुरु होईल. शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी भरणार असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात शिक्षणविभागाने निर्देश जाहीर केले आहेत. तसेच शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. उपस्थिती अनिवार्य पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती शाळांमध्ये अनिवार्य असणार आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखील शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक राहणार आहे. सध्या दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. ठराविक वेळेत हा निकाल जाहीर होणे गरजेचे असल्याने संबंधित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vpFviU
via IFTTT

Post a Comment

0 Comments