मुंबईत पहिल्या दिवशी शाळांचा गोंधळाचा तास

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सुट्टीनंतर मंगळवारपासून पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू ( reopening online) झाले. मात्र पहिलाच दिवस गोंधळाचा ठरला. शिक्षकांना शाळेत उपस्थिती सक्तीची केली. मात्र, लोकल प्रवासाला मुभा नसल्याने (Mumbai local train update) शाळेत पोहोचू शकले नाहीत. परिणामी काही शिक्षकांनी रस्त्यावर उभे राहून तर काही शिक्षकांनी रेल्वे स्थानकातून सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दहावीच्या निकालाचे काम २५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण लोकलमध्ये प्रवेश नाही, बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे. यामुळे शाळेत पोहोचण्यासाठी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहे. सरकारी निर्णयानुसार शिक्षकांना शाळेत उपस्थिती बंधनकारक आहे. मुंबईतील ७० टक्के शिक्षक बाहेरून येतात. यात महिला शिक्षकांचा टक्का अधिक आहे. यामुळे खासगी वाहनाने प्रवास करणे ही किफायतशीर ठरत नाही. शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, यासाठी सानपाडा, टिळकनगर, चेंबूर, गोवंडी, जुईनगर, बेलापूर, कुर्ला, भांडुप, कल्याण, विरार, वसई, मिरा रोड, दहिसर, मालाड या रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून आंदोलनही करण्यात आले. मात्र तरीही शालेय शिक्षण विभागाकडून कोणीतीही हालचाल झाली नाही. यामुळे पहिल्या दिवशी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहता आले नाही. यामुळे पहिला दिवस गोंधळाचा ठरला. बसने निघाल्यापासून शाळेत पोहोचेपर्यंत तीन ते चार तास लागतात. पुन्हा घरी पोहोचण्यासाठीही अशीच कसरत करावी लागते. प्रवासात आठ-दहा तास मोडत आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे लवकरात लवकर शिक्षकांना लोकलमुभा मिळावी, अशी मागणी होत आहे. रेल्वेला पत्र मुंबई महापालिका क्षेत्रातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. काय आहेत नियम? शिक्षकांना शाळांत उपस्थिती बंधनकारक असणार आहे. इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के शिक्षक उपस्थिती तर दहावी आणि बारावी वर्गाच्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापक आणि ज्युनिअर कॉलेजांचे प्राचार्यांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत १०० टक्के उपस्थित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाइन असले तरी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vro2Xh
via IFTTT

Post a Comment

0 Comments