CBSE Evaluation Criteria:सीबीएसई बारावी निकाल लवकरच,'या' तारखेला मिळणार मूल्यांकन रिपोर्ट

Criteria Report, Class 12th Result 2021:केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने(CBSE) बारावी परीक्षांच्या निकालाची घोषणा(CBSE 12th Result 2021) करताना मूल्यांकन पद्धत अवलंबली आहे. यासाठी १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती १८ जूनला आपला अहवाल सादर करणार आहे. करोना प्रादुर्भाव पाहता सीबीएसईने आपल्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. १ जून २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. 'खूप विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांच्या आरोग्य आणि भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे' पंतप्रधान म्हणाले. वैकल्पिक मूल्यांकन प्रक्रियेवर निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यीय समिती सोमवारी (१४ जून) आपला अहवाल देणार होती. त्यानंतर १६ जून ही तारीख देखील सांगण्यात येत होती. पण आता १८ जून या तारखेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पारदर्शी आणि निष्पक्ष पद्धतीने बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. समितीचे बहुतांश सदस्य दहावी आणि अकरावीमध्ये मिळालेल्या गुणांना महत्व देणे आणि बारावीच्या प्री बोर्ड तसेच अंतर्गत परीक्षांना आधार बनवण्याच्या बाजुचे आहेत, असे एका सुत्राने सांगितले. शिक्षण मंत्रालय (Education Ministry) च्या सूत्रांनुसार, सीबीएसई रिझल्ट एक्सपर्ट कमेटी दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या गुणवत्तेला बारावी बोर्ड परीक्षा २०२१ (CBSE 12th evaluation 2021) आधार बनवण्यावर विचार करत आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना दहावी बोर्डमध्ये त्यांचा परफॉर्मन्स अकरावीची अंतिम परीक्षा आणि बारावी प्री बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे दिले जातील. हा प्रस्ताव लागू झाला तर या वर्षी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन १)दहावी बोर्ड परीक्षा, २) अकरावी अंतिम परीक्षा आणि ३)बारावी बोर्ड परीक्षा या तीन चाचणींच्या आधारे होईल. पण याला किती गुण दिले जाणार ? यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. थिअरीचे एकूण ७० गुण असणार आहेत. केंद्र सरकारने १ जूनला सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सीबीएसईला क्लास १२ मार्किंग स्कीम आणि इव्हॅल्युएशन प्रोसेसची डिटेल सबमिट करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला. दोन-दिवसांच्या आत सीबीएसई बोर्ड(CBSE Board) गुण पद्धतीची माहिती कोर्टाला देईल. मूल्यांकन पद्धतीसंदर्भातील संपूर्ण माहिती बोर्डाचे संकेतस्थळ cbse.nic.in वर देखील देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zsGeTH
via IFTTT

Post a Comment

0 Comments