नोकरीसाठी मुलाखतीची तयारी कशी करू?

स्वाती साळुंखे ० कृपया मला नोकरीविषयी काही प्रश्नांची उत्तरे द्या. आयटी कंपनीत कामाचा मला दीड वर्षाचा अनुभव आहे. माझे प्रश्न आहेत, नोकरीसाठी मुलाखत क्लिअर कशी करावी? माझ्या करिअरमध्ये योग्य नोकरी कशी निवडता येईल? प्राजक्ता माने तुम्हाला नोकरीसाठी मुलाखत देताना कुठे अडथळा येतो आहे हे आधी जाणून घ्यावे लागेल. कुठलीही कंपनी त्यांच्यासाठी योग्य ते उमेदवार निवडते. त्यामुळे फार कमी लोकांना स्वत:साठी हवी तशी नोकरी निवडण्याची संधी मिळते. कृपया यासाठी एखाद्या चांगल्या समुपदेशकाकडून करिअरसंबंधी समुपदेशन घ्या. कारण तुमच्यातील सामर्थ्य, कच्चे दुवे, तुमचे ध्येय, वैयक्तिक लक्ष देण्याची गरज असलेल्या काही बाबी समजून घेतल्यानंतरच याबाबत योग्य मार्गदर्शन देता येईल. काही वेबसाइट्स आहेत, ज्यात मुलाखतीबाबत टिप्स / स्वत:चे वेळापत्रक बनविणे / नोकरी निवडणे यासाठी चांगल्या टिप्स दिल्या जातात. आपण त्यासंबंधीचे व्हिडीओ किंवा पोस्ट्सही वाचू शकता. ० माझा मुलगा दहावीला असून त्याला ९० टक्के गुण मिळतील अशी तयारी आहे. त्याला आयआयटीला जायचे आहे. त्यासाठी तयारी कशी व केव्हा करावी? - अंजली सावंत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रथम आपल्या मुलाची योग्यता, बुद्धयांक तपासून घ्या. जर त्याच्याकडे आवश्यक बुद्धयांक आणि योग्यता /अॅप्टिट्यूड असेल तर तो अकरावी आणि बारावीमध्ये विज्ञान विषय घेऊ शकतो. आयटीआयटीच्या तयारीसाठी स्वतःच्या अभ्यासाबरोबर शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. या दरम्यान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा पाया मजबूत करणे तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे यावर लक्ष द्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xB1AwF
via IFTTT

Post a Comment

0 Comments