Also visit www.atgnews.com
उच्च शिक्षणातील CET ची अद्याप प्रतीक्षाच; लॉ, बीएड, बीपीएड सीईटीकडे विद्यार्थ्यांचे लागले लक्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सामायिक परीक्षा कक्षाने इंजिनीअरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चर अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’च्या (MHT-CET) अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र, उच्चशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या लॉ, बीएड, बीपीएड, एमपीएड अशा आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी-पालकांचा लक्ष लागले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चर अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला ८ जूनपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र, उच्चशिक्षण संचालनाल्याच्या अखत्यारित येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. या सीईटी परीक्षा देण्यासाठी बारावी; तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पात्रता आहे. उच्चशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित लॉ (तीन वर्षे), लॉ (पाच वर्षे), बीएड/ एमएड (इंटिग्रेटेड), बीए-बीएस्सी/ बीएड (इंटिग्रेटेड), बीपीएड, बीएड, एमएड अशा आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलकडून घेण्यात येतात. या सीईटी परीक्षांसाठीचे अभ्यासक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. मात्र, परीक्षा कधी होतील, याबाबत सीईटी सेलने कोणतीही माहिती प्रकाशित केलेली नाही. त्यामुळे या परीक्षांची नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होईल, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लॉ सीईटीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे लक्ष ‘लॉ’ (तीन/पाच वर्ष) सीईटीकडे लागलेले असते. दर वर्षी या परीक्षा वेळेत होत नसल्याची तक्रार विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येते. परीक्षा वेळेत होत नसल्याने, प्रवेश प्रक्रिया रेंगाळते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे निम्म्यापेक्षा अधिक वर्ष प्रवेश प्रक्रियेत जाते. दर वर्षी लॉ सीईटीची होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी, सीईटी परीक्षा वेळेत घेण्यात येउन, नियोजन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. ‘नियोजन जाहीर करावे’ उच्चशिक्षण संचालनालयाच्या आठ सीईटी परीक्षांचे अभ्यासक्रम सीईटी सेलच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे. मात्र, नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही. त्याचप्रमाणे परीक्षा कधी होतील, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सीईटी सेलने या अभ्यासक्रमांच्या सीईटीबाबत माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q440B6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments