राज्यात लवकरच मोठी प्राध्यापक भरती; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

Recruitment:राज्यातील प्राध्यापकांसाठी दुहेरी आनंदाची बातमी आहे. २०१३ पासून राज्यात बंद असेली प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र यांनी दिले आहे. नोकरीपासून वंचित असलेल्या राज्यभरातील उमेदवारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. राज्यात सध्या विविध कॉलेजमधील पंधरा हजारावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या देखील भरण्यात येणार आहेत. तसेच तासिका प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासनंही उदय सामंत यांनी दिले आहे. गोंदियात झाालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात सध्या विविध कॉलेजमधील पंधरा हजारावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. २०१३ पासून ही भरती बंद आहे. या पदावर भरती व्हावी म्हणून राज्यातील पन्नास हजारावर नेटसेटधारक आणि पीएच.डी पदवी मिळवलेल्यांनी प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर पाच वर्षापूर्वी युती सरकारने चाळीस टक्के भरतीला मान्यता दिली होती. यामुळे भरतीची आशा निर्माण झाली होती, पण सरकारने प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही. उलट पुन्हा नवीन आदेश काढून भरतीला बंदी घालण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही भरती सुरू होईल अशी आशा नेट सेट व पीएच.डी धारकांना होती. याच काळात करोना संसर्गामुळे राज्यासमोरील आर्थिक संकट वाढले. यामुळे ही भरती थांबली. ही भरती तातडीने करावी म्हणून आंदोलन आणि पाठपुरावा सुरु होता. याला अखेर आज यश मिळाले आहे. तासिका प्राध्यापकांनादेखील वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. करोना संसर्गामुळे अनेक महिने कॉलेज बंद राहिल्याने तास झाले नाहीत. तासच झाले नसतील तर मग मानधन कसे द्यायचे ? असा प्रश्न प्रश्न संस्थाचालकांनी सुरू केला आहे. यामुळे या सीएचबी प्राध्यापकांचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. ‘मान’ ही नाही आणि ‘धन’ ही नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर यांना देखील दिलासा मिळाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2S0SnOZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments