अमेरिका व्हाया अन्य देश; मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांचे चार्टर्ड फ्लाइटने उड्डाण!

Education Visa Update: परदेशी जाऊन पुढील उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने लसदिलासा दिला असला, तरी अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणींचा पाढा संपलेला नाही. काही विद्यार्थी अजूनही व्हिसासाठी पायपीट करत आहेत. विशेषत: अमेरिकेत जाऊ इच्छिणारे विद्यार्थी, त्यांचे पालक तर जुलै आणि ऑगस्टमध्ये तेथील कॉलेज जॉइन करायचे असलेले विद्यार्थी व्हिसासाठी () संघर्ष करत आहेत. तर दुसरीकडे अनेक श्रीमंत पालक चार्टर्ड फ्लाइटने मुलांना व्हाया इतर देश अमेरिकेत सोडत आहेत. १ मे रोजी अमेरिकेने भारतात असलेल्या नॉन इमिग्रंट्सना प्रवेश बंदी केली होती. ज्या विद्यार्थ्यांना यूएसला परतायचे होते, त्यांना मज्जाव करण्यात आला होता. वॉशिंग्टननेही केवळ 'राष्ट्रीय महत्वाच्या व्यक्तींना' दारं उघडली होती. काही अतिउत्साही पालकांनी या विभागातूनही व्हिसासाठी अर्ज केले होते. 'एका सुप्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला या ऑगस्टमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये उपस्थित राहायचे होते. या बिल्डरने दुबईला चार्टर्ड फ्लाइटने जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे पंधरवडाबर राहून हे कुटुंब यूएसला जाऊन मुलाला त्याच्या लॉस एंजेलिस येथील विद्यापीठात सोडणार आहेत,' अशी माहिती परदेशी शिक्षण समुपदेशक करण गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. अन्य एक समुपदेशक सोनल पारेख यांनीही या माहितीला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, 'ज्या पालकांचे व्यवसाय दुबईत आहेत, ते तेथे राहून नंतर यूएसकडे जात आहेत.' पालक आपल्या पाल्यांसह ज्या पद्धतीने प्रवास करत आहेत, त्याबद्दलही जाणून घेणे रंजक आहे. ज्या श्रीमंत पालकांना परवडत आहे, ते थेट चार्टर्ड फ्लाइट्स करत आहेत. पण ज्यांना अशा महागड्या फ्लाइट्स आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीएत तेही येनकेन प्रकारे अशा देशांत रवाना होत आहेत, जेथे भारतीयांना प्रवेशबंदी नाही, आणि यूएसमधील प्रवेशबंदी नसणाऱ्या देशांच्या यादीत असलेले असे देश आहेत. तेथे राहून तेथून पुढे यूएसला रवाना होण्याचा ट्रेंडच बनला आहे. भारतातील अमेरिकी दूतावासानेही सोशल मिडीयावर विद्यार्थ्यांच्या वाढत्या व्हिसा मागणीसंबंधी माहितीत दिली होती. १४ जूनपासून हजारो विद्यार्थ्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये व्हिसा अपॉइंटमेंट घेतल्या आहेत, अशी माहिती दूतावासाने दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35opdw3
via IFTTT

Post a Comment

0 Comments