दहावी परीक्षेचे मूल्यमापन करणे सोपे, हेल्पलाइन नंबर जाहीर

:करोना प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण बोर्डाने घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे करुन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हे मूल्यमापन कसे होणार यासंदर्भात विद्यार्थी-पालक तसेच शिक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. २८ मे २०२१ ला माध्यमिक शिक्षण बोर्डाने यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. तसेच नुकतेच यासंदर्भातील नंबर देखील जाहीर करण्यात आले आहेत. मूल्यमापनाचा तपशिल बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामुळे नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, काही विषय घेऊन बसलेले विद्यार्थी यांचे मूल्यमापन करताना याचा फायदा होणार आहे. तसेच पालक, शिक्षकांमधील संभ्रम देखील दूर झाला आहे. तसेच दहावीच्या मूल्यमापन कार्यपद्धतीच्या प्रशिक्षणाचा व्हिडीओ देखील मंडळाच्या युट्यूब चॅनलवर १० जूनपासून अपलोड करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. मूल्यमापन करताना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळाप्रमाणे स्वतंत्र हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. विभागीय मंडळाचे सचिव, सहा.सचिव,अन्य अधिकारी संबंधितांना मार्गदर्शन करणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ggvSyT
via IFTTT

Post a Comment

0 Comments