Also visit www.atgnews.com
बारावीच्या निकालाबाबत होणार निर्णय,शिक्षणमंत्र्यांनी बोलावली बैठक
: सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन पद्धत जाहीर केली. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाबाबत निर्णय कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील महत्वाची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीत बारावी परीक्षा मुल्यांकन पद्धत आणि निकाल्याच्या तारखेवर निर्णय होऊ शकतो. CBSE च्या झालेल्या निर्णयाच्या धर्तीवर सूत्र ठरवून त्यावर निर्णय घेण्यासाठी आज बैठक बोलावल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. या बैठकीत शिक्षण विभाग आणि मंडळाचे अधिकारी, शिक्षक- पालक प्रतिनिधी, प्राचार्य हे उपस्थित असणार आहेत. दरम्यान दहावीच्या शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. पालिका दुसऱ्या गटात नसल्याने ही परवानगी नाकारण्यात येत होती. पण विद्यार्थ्यांचा निकाल आणि मूल्यांकनाचा वाढता व्याप पाहता शिक्षकांना रेल्वे प्रवास आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहाणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होणार आहे. शिक्षकांना ऑनलाइन रेल्वे पास शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेव्हल २ किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे रेल्वे पास ऑनलाइन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे काम पाहतील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. सीबीएसईचा निकाल सीबीएसई बोर्डाने बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डाच्या निकालावर आधारित अंतिम निकाल तयार होईल.सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. दरम्यान, दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत उत्सुकता आहे.३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, असे परीक्षा नियंत्रक सत्यम भारद्वाज यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gz8BYT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments