COVID-19:अनाथ मुलांना मोफत शिक्षणासहित मिळणार अनेक लाभ

COVID-19:जगभरात कोरोना व्हायरस (COVID 19) प्रादुर्भावात लाखो जीव गेले आहेत. भारतात देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. या महामारीत ज्यांनी आपला जीव गमावलाय, त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी हात पुढे केले आहेत. तसेच आता विद्यापीठ देखील करोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तयार आहेत. दिल्ली आणि इलाहाबाद विद्यापीठाने देण्याचे जाहीर केले आहे. करोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांच्या मदतीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मासिक भत्ता, आरोग्य विमा आणि १० लाख रुपयांची एफडी दिली जाणार आहे. २३ वर्षे वयात आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रनमधून १० लाख रुपये दिले जाणार आहेत. करोना व्हायरसमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारांनी देखील आपापल्या घोषणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये दिल्ली दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमध्येसहित अनेक राज्यांचा समावेश आहे. विद्यापीठातर्फे करोनाने मरण पावलेल्या कर्मचारी आणि पेमेंट क्लिअर करणे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले आईवडील गमावले त्यांना दिल्ली विद्यापीठात मोफत शिक्षण दिले जाणार आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी (Delhi University) चे कार्यवाह कुलगुरु पीसी जोशी यांनी म्हटले. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ शिक्षण निधीतून मदत देण्यासाठी पूर्ण माहिती गोळा केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gy2L8V
via IFTTT

Post a Comment

0 Comments