ISRO Free Online Course: घरबसल्या मोफत शिका इस्रो ऑनलाइन कोर्स

Free Online Course:भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation किंवा ISRO)ने फ्री ऑनलाइन कोर्सची सुरुवात केली आहे. जे विद्यार्थी घरबसल्या प्रोफेशनल कोर्सचा अभ्यास करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. इस्रोने तीन नवे प्रोफेशनल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग (),देहरादूनद्वारे हे अभ्यासक्रम आयोजित केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याकरिता कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे तिन्ही अभ्यासक्रम मोफत आहेत. विद्यार्थ्यांना ते पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आयआयआरएस देहरादूनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आयआयआरएस (IIRS) यूट्यूब चॅनेल द्वारे या अभ्यासक्रम सत्रात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ तासांनंतर उपलब्ध होणाऱ्या सत्राद्वारे आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इस्रो ऑनलाइन कोर्स कोणते? मशीन लर्निंग टू डीप लर्निंग: रिमोट सेंसिंग डाटा क्लासिफिकेशन ओव्हरव्ह्यू ऑफ जीआयएस टेक्नॉलॉजी अर्थ ऑब्झर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी कधी-कधी होणार वर्ग? पाहा पूर्ण वेळापत्रक इच्छुक आणि योग्य उमेदवार आयआयआरएसची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3pSqEMT वर जाऊन इस्रोच्या ऑनलाइन कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात, ऑनलाइन अॅप्लिकेशन विंडो खुली आहे. मशीन लर्निंगचे वर्ग ५ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत होतील. जीआयएस टेक्नॉलॉजीचे वर्ग २१ जून ते २ जुलै २०२१ या कालावधीत होतील. अर्थ ऑब्झर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी कोर्सचे वर्ग २१ जून ते २५ जून २०२१ या कालवधीत होतील. ISRO Free Online Course:कसे करायचे रजिस्ट्रेशन? जे विद्यार्थी इस्रो फ्री ऑनलाइन क्लासेसना प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी इस्रो किंवा आयआयआरएसच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, इयत्ता दहावीची गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेट, ईमेल आणि पासवर्ड, ते ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्याचे पूर्ण नाव आदीची निवड करावी लागेल. वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती तसेच आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ऑनलाइन क्लासेस कुठे कुठे होणार? नोंदणीकृत विद्यार्थी आयआयआरएस देहरादूनच्या ई-क्लास पोर्टल म्हणजेच eclass.iirs.gov.in च्या माध्यमातून कोणत्याही वेब ब्राउजरच्या माध्यमातून या वर्गांना उपस्थित राहू शकतात. आयआयआरएसच्या यूट्यूब चॅनल https://www.youtube.com/user/edusat2004 द्वारे देखील लाइव्ह वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pQq2as
via IFTTT

Post a Comment

0 Comments