Also visit www.atgnews.com
JAM 2021:परीक्षेतून देशभरातील आयआयटीमध्ये मिळेल प्रवेश,पहिली यादी होणार जाहीर
JAM 2021:इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरु (, IISc) ने आज १६ जून २०२१ रोजी आपली पहिली प्रवेश यादी जाहीर करण्यात येत आहे. JAM २०२१ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट jam.iisc.ac.in वर जाऊन यादी तपासू शकता. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरुने यासंदर्भात अधिकृत ट्वीट केले आहे. या ट्वीटनुसार पहिली यादी १६ जूनला जाहीर केली जात आहे. दुसरी यादी १ जुलै आणि तिसरी यादी १६ जुलैला जाहीर केली जाणार आहे. तसेच संस्थेतर्फे २० जुलै २०२१ ला प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पहिल्या यादीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना यादी पाठविली जाईल. यानंतर उमेदवारांना जागा निश्चितीसाठी सामान्य / ओबीसी-एनसीएल / ईडब्ल्यूएस वर्गासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील. तर अनुसूचित जाती जमाती/ पीडब्ल्यूडी वर्गाच्या उमेदवारांना ५ हजार रुपये भरावे लागतील. या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील आयआयटीमध्ये दोन वर्षे एमएससी, ज्वॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री आणि इतर मास्टर कोर्सेससाठी प्रवेश मिळू शकतो. याव्यतिरिक्त, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स इंटिग्रेटेड पीएचडी पाठ्यक्रमात देखील प्रवेश दिला जातो. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. IISc जेएएम ()ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन वेळेत होणार होती. या परीक्षेचा निकाल २० मार्च २०२१ ला येणार होता. आता या प्रवेश प्रक्रियेसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. JAM २०२१ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० सप्टेंबर २०२० पासून सुरू झाली. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२० होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iQtAIx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments