CLAT 2021:नोंदणीची तारीख संपली,२३जूलैला होणार परीक्षा

CLAT 2021:कॉमन लॉ एडमिशन टेस्टसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यासाठी नोंदणी करण्याची १५ जून २०२१ ही शेवटची तारीख होती. उमेदवारांना यासंदर्भात अधिकृत संकेतस्थळ https://ift.tt/2Qkp6cX वर अधिक माहिती मिळू शकते. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिवर्सिटीज (CNLU) द्वारे परीक्षेची तारीख २३ जुलै जाहीर करण्यात आली आहे. याआधी १३ जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. CLAT २०२१ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया १ जानेवारी २०२१ ला सुरु झाली. १५ जून ही नोंदणीची शेवटची तारीख होती. २३ जुलैला २ ते ४ वाजता ही परीक्षा होणार आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर परीक्षा केंद्रात नियमांचे काटकोर पालन केले जाणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी द कॉमन लॉ एडमिशन टेस्ट ही राष्ट्रीय पातळीवरची कायदा विषयाची प्रवेश परीक्षा आहे. ही देशातील २२ विद्यापीठांमध्ये होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U0U6UW
via IFTTT

Post a Comment

0 Comments