SC GD Constable Notification 2021:जीडी कॉन्स्टेबल पदासाठी नोटिफिकेशन, जाणून घ्या

Notification 2021:कर्मचारी निवड आयोग (SSC)द्वारे जीडी कॉन्स्टेबल पदांवर नोकरीसाठी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. देशातील करोना रुग्णसंख्येत कमी आल्यानंतर जून महिन्याच्या अखेरपर्यंत नोटिफिकेशन जाहीर होण्याची शक्यता आहे. एसएसएसीतर्फे यासंदर्भात कोणती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील वेळापत्रकानुसार, जीडी कॉन्स्टेबल परीक्षेसाठी २५ मार्च २०२१ च्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार होते. पण काही कारणामुळे ते जाहीर होऊ शकले नाही. यानंतर ९ एप्रिल २०२१ शॉर्ट नोटीस जाहीर केली होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असल्याचे यात सांगण्यात आले होते. जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे आयोजन २ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत केले जाणार आहे. नोटीफिकेशन जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी सीमा सुरक्षा (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय रिझर्व पोलीस बल(CRPF), भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल ( SSB),नॅशनल इंस्टीगेशन एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF)आणि असम राइफल्स (जनरल ड्यूटी) च्या भरतीसाठी SSCची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करावा. दहावी पास उमेदवार (SSC GD Constable Recruitment 2021)या भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे. २०१८ मध्ये ६०२१० रिक्त जागा भरण्यासाठी SSC GD Constable भरती करण्यात आली होती. यामध्ये एकूण ५५ हजार ९१५ उमेदवार (पुरुष -४७५८२, महिला -८३३३) कॉंस्टेबल (जीडी) आणि राइफलमॅन (जीडी) च्या पदांसाठी निवड केली गेली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zEObWf
via IFTTT

Post a Comment

0 Comments