Also visit www.atgnews.com
देशात केवळ 'इतक्या' टक्के शाळांमध्ये कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन- UDISE रिपोर्ट
UDISE Report: देशातील फक्त ३९ फीडिंग शाळांमध्ये कॉम्प्युटर आहेत आणि साधारण २२ टक्के शिक्षण संस्थांमध्ये आहे. ही माहिती युनिफाइड डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन सिस्टम फॉर एजुकेशन प्लस(Unified District Information System for Education Plus UDISE ) ने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. सन २०१९-२० मध्ये ९० टक्के अधिक शाळांमध्ये हात धुवण्याची सुविधा उपलब्ध झाली असेही या अहवालात म्हटले आहे. सन २०१२-१३ च्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे. याआधी हे प्रमाण केवळ ३६.३ टक्के होते. UDISE च्या अहवालांनुसार देशातील साधारण ३९ टक्के शाळांमध्ये २०१९-२० मध्ये कम्प्युटर आहेत. यात मागच्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी सुधारणा पाहायला मिळतेय. याव्यतिरिक्त वर्ष २०१९-२० मध्ये भारतात २२ टक्के इंटरनेट कनेक्टिव्हिटी होती. पण मागच्या वर्षाच्या तुलनेत ३.५ टक्के सुधारणा पाहायला मिळतेय. या कालावधीत २०१९-२०मध्ये ८३ टक्के अधिक शाळांमध्ये वीज होती. जी मागच्या वर्षी २०१८-१९ च्या तुलनेत साधारण ७ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच वर्ष २०१९-२० मध्ये देशात ८४ टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये वाचनालयाची सुविधा होती. जी मागच्या वर्षापेक्षा साधारण ४ टक्क्यांनी सुधारलेली आहे. दरम्यान २०१२-१३ मध्ये केवळ ६९.२ टक्के शाळांमध्ये वाचनालय होते. यासोबतच देशात २०१२८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये शाळांमध्ये सर्व स्तरांवर मुलींच्या नामांकनात वाढ झाली आहे. ही वाढ प्री-प्रायमरी स्तरावर सर्वाधिक होती. तसेच शाळांमध्ये शिक्षकांच्या संख्येत २०१८-१९ च्या तुलनेत वर्ष २०१९-२० मध्ये २.७२ टक्क्यांनी वाढ झाली. २०१९-२० मध्ये ९६.८७ लाख शिक्षक शालेय शिक्षणात होते. जे २०१८-१९ च्या संख्येच्या तुलनेत साधारण २.५७ लाख अधिक आहेत असे या अहवालामध्ये म्हटले आहे. अहवालात असे देखील म्हटले आहे की, शालेय शिक्षण सर्व स्तरांवर जीईआरमध्ये २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये सुधारणा झाली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jsfopf
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments