‘प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर कुलगुरूंचे’; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांनी सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन आणि चारित्र्य जोपासून नेतृत्व गुणांची जोपासणा करावी असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. यांनी विद्यार्थ्यांना दिला. चारित्र्याची सचोटी जोपासताना फक्त पुस्तकी शिक्षणातून नव्हे तर आपल्या दैनदिन जीवनक्रमात आपल्या वागणूकीतूनही ती सहजपणे जोपासता येत असल्याचे सांगून, माझं म्हणून जगण्यापेक्षा आपलं म्हणून जगण्याची कला विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा असा अमुल्य सल्लाही त्यांनी दिला. ‘प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर कुलगुरूंचे’ या सदराखाली आयोजित करण्यात आलेल्या आभासी कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून प्रश्न मागविण्यात आले होते. आयोजकांकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची छाननी करून अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे कुलगुरूंनी दिली. सहा हजाराहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रविष्ठ होऊ इच्छिणारे विद्यार्थी तसेच पदवी अभ्यासक्रमांना प्रविष्ठ असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न, शंका, समस्या उपस्थित केल्या होत्या. ज्यामध्ये ऑनलाईन शिक्षणातील अडचणी, इंटरनेटची सुविधा, प्रात्यक्षिके, अभ्यासक्रम, शुल्क माफी, लसीकरण, पीडीएफ स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देण्याची विद्यार्थ्यांची विनंती अशा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी कुलगुरूंनी दिली. आजमितीस महाविद्यालयामार्फत राबिवण्यात येणाऱ्या विद्यार्थी अपघात विमा योजनेचे स्वरुप विस्तारीत करून अचानकपणे उद्भवणारे आजार, कोरोनामुळे बाधीतांना मदत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शूल्क माफी, कमवा व शिका या योजनेचा विस्तार करण्यावर विद्यापीठाचा अधिक भर असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजाबाबत असलेल्या शंका, अडचणी यांचे निवारण करण्यासाठी विद्यापीठामार्फत नजीकच्या काळात कॉलसेंटर सुरु केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बदलत्या शिक्षणपद्धतीनुसार विद्यापीठाने अधिकाधीक अभ्यासक्रमांना कौशल्याची जोड दिली असून, कौशल्याधारीत शिक्षण पद्धतीचा स्विकार तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणपद्धतीत होणाऱ्या बदलांना अनुषंगून विद्यापीठामार्फत पावले टाकली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात तंत्रज्ञानाधिष्ठीत शिक्षण हे अधिक बळकट होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनीही तयारी करावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठामार्फत या शैक्षणिक वर्षापासून अनेक नव्या उपक्रमांना सुरुवात केली जात असून अनेक नविन अभ्यासक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jG4H2j
via IFTTT

Post a Comment

0 Comments