IITM Recruitment 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये १५६ जागांची भरती

IITM 2021: पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये(IITM)विविध पदांवर भरती आहे. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचून या पदांसाठी अर्ज करावा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५६ जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांवर पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक १ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यानंतर आलेल्या अर्जाचा विचाार केला जाणार नाही. या विविध पदांवर नोकरी करणाऱ्या उमेदवारास १८ हजार ते ७८ हजारपर्यंत पगार देण्यात येणार आहे. तसेच वय वर्षे ३५ ते ६५ वयांपर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. आरक्षित वर्गाला वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईट https://ift.tt/2ubTwni च्या करिअर सेक्शनमध्ये या नोकरीबद्दल माहिती मिळेल. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. कोणत्या जागा रिक्त ? प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यकारी प्रमुख, वरिष्ठ प्रकल्प सहकारी, प्रशिक्षण समन्वयक, प्रकल्प सहकारी, तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, फील्ड कामगार, सायंटिफिक प्रशासकीय सहाय्यक, वरिष्ठ लिपिक आणि विभाग अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. अर्जदाराकडे भारतीय असणे गरजेचे आहे. जाहीरातीनंतर जास्त प्रमाणात उमेदवारी अर्ज आले तर सर्वांची लेखी परीक्षा घेणे शक्य नाही. अशावेळी अर्जदाराची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव पाहीला जाईल. विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी आहे. यासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hypjaa
via IFTTT

Post a Comment

0 Comments