HSC Result 2021: बारावीच्या निकालाचा तिढा सुटला; सीबीएसईप्रमाणे ३०-३०-४० फॉर्म्युला

HSC Result 2021: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांच्या यंदाच्या वर्षाची मूल्यांकन पद्धत राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार, इयत्ता दहावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के वेटेज यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला असणार आहे. दहावीच्या वर्षांच्या गुणांचे वेटेज लक्षात घेताना सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत. साधारणपणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)च्या धर्तीवर राज्य सरकार आणि राज्य मंडळाने समन्वय समितीच्या माध्यमातून हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. रिपिटर्सचा बारावीचा निकाल कसा? इयत्ता दहावीत निकालातील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण घेऊन त्याला ५० टक्के वेटेज आणि बारावीतील आधीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची सरासरी घेऊन त्याला ५० टक्के वेटेज देऊन पुनर्परीक्षार्थींचा बारावीचा निकाल तयार करण्यात येणार आहे. खासरीरित्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल कसा असेल? इयत्ता दहावीत निकालातील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण घेऊन त्याला ५० टक्के वेटेज आणि बारावीतील सराव चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प आदी अंतर्गत मूल्यमापनातील विषयनिहाय गुण यांचे ५० टक्के वेटेज घेऊन खासगीरित्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. बारावी मूल्यमापन आराखड्याविषयीचा जीआर पुढीलप्रमाणे - कनिष्ठ महाविद्यालयनिहाय निकाल समिती बारावीचा निकाल तयार करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा वा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मुख्याध्यापक वा प्राचार्यांसह ७ सदस्यीय निकाल समिती स्थापन करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ydDSGU
via IFTTT

Post a Comment

0 Comments